शहेजाद खान /----
चांदुर रेल्वे---

चांदूर रेल्वे नगरपरिषदेमध्ये घरकुल मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आरटीआय ऍक्टिव्हिस्ट गौतम जवंजाळ यांनी विहिरीत बसून उपोषणाला मागील पाच दिवसांपासु न सुरवात केली होती. मात्र आज शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना चांदुर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात भरती करण्यात आले. तद्नंतर त्यांना दुपारी प्रकृती अती खालावल्याने त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र तेथे प्रशासनाने जबरदस्तीने ज्युस पाजुन त्यांचे उपोषण सोडवल्याचा प्रकार आज घडला.त्यामुळे आंदोलन अजुनही थांबलेले नसल्याची प्रतीक्रीया श्री जवंजाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. गौतम जवंजाळ हे शुद्धीवर आल्यावर त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना आपणावर कुठलाही उपचार करू नका असे सांगितले आपले उपोषण सुरूच आहे परंतु पोलीस प्रशासनाचा सांगण्यावरून त्यांना सलाईन चढवण्यात आली होती त्यानंतर
त्यांचा नकार असतानाच त्यांना इर्विन ला भारती करण्यात आले माजी आमदार श्री अरुण अडसड, यांनी दोषींवर कारवाई झाल्याचे सांगून आपल्याला ज्यूस पाजण्याचा प्रयत्न केला . जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्रानुसार तत्कालीन मुख्याधिकारी पीडी राठोड यांना दोषी ठरवत शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत असल्याचे नमूद केले परंतु इतर ८ मागण्यांचे काय पालिकेतील इतर दोषी अधिकारी कर्मचारी तसेच लाभार काय कारवाई केली याबाबत मला कुठलीही माहिती दिलेली नाही त्यामुळे आपले आंदोलन हे सुरूच ठेवणार असून यानंतर ते अधिक तीव्र स्वरूपाचे असणार असे ते म्हणाले .
** ९ मुद्यांचे आम्ही स्पष्टीकरण देऊ - मुख्याधिकारी **
घरकुल घोटाळया संदर्भात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही श्री जवंजाळ यानाचा ९ मुद्यांचा अनुषंगाने त्यांना उत्तर देऊत पोलीस स्टेशन ला गेले म्हणजे गुन्हा दाखल करायलाच गेले हे कशावरून ? असा प्रश्न विचारात नगर परिषद मुख्याधिकारी माननीय स्मिता ठाकरे यांनी आणि जवंजाळ यांना स्पष्टीकरण देऊ असे त्यांनी सांगितले .---
**जुन्या अहवालावरून कारवाईचे आदेश **--उपविभागीय अधिकारी श्री विधाते
जवंजाळ प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्यासंदर्भात निर्देश दिले आहे नप मुख्याधिकार्यांना नव्याने चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही त्या अहवालानुसार कारवाई करण्याचा आदेश आहे - या प्रकरणात काही करू शकत नसून केवळ मागोवा घेण्याचे आमचा कडे काम आहे या संदर्भात नप मुख्याधिकारी योग्य ती माहिती घेणार असल्याचे उपविभागीय अधिकारी श्री विधाते यांनी सांगितले
** जवंजाळ यांची प्रतीक्रीया- **
प्रशासनाने जबरदस्ती करीत उपोषण सोडण्याचे प्रयत्न केले, आपल्याला मागण्या पूर्ण झाल्याचे सांगून जूस पाजल्या गेला, परंतु अजूनही माझ्या 9 मुद्द्यांवर कारवाइचे पत्र मिळाले नाही त्यामुळे अद्यापि आपले आंदोलन थांबले नाही - -श्री गौतम जवंजाळ.
Post a Comment