BREAKING NEWS

Monday, April 4, 2016

ड्रेनेजचेंबर ची दुरुस्तीची मागणी : ठेकेदाराच्या कामाला नागरिक कंटाळले



* अनिल चौधरी / कोंढवा * / : येवलेवाडी येथील धांडेकर नगरमधील नंदपेंट्स कंपनीसमोरील ड्रेनेज चेंबरमधून मैलापाणी मुख्य रस्त्यावर अर्धा किमी पर्यंत वाहत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यास गंबीर धोका निर्माण झाला आहे त्यामुळे ड्रेनेजचेंबर ची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करु असा गंबीर इशारा मनसेचे नेते उमेश धांडेकर यांनी दिला आहे .

याबाबत अधिक बोलताना म्हणाले दोन महिन्यांपूर्वी पालिकेचे येवलेवाडी विभाग पाहणारे बारावकर यांच्याशी संपर्क करून दुरुस्ती करण्यास सांगितले होते , त्यांनी त्वरित दखल घेऊन ठेकेदारास ड्रेनेजची दुरुस्ती करण्यास सांगितले होते . पालिकेच्या ठेकेदाराने या चेंबरची दुरुस्ती केली होती. परंतु निकृष्ट दर्जाची कामे केल्याने वारंवार मैलापाणी रस्त्यावर येवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीयुक्त मैलापाणी रस्त्यावर आल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे पालिकेने हे काम लवकरात लवकर करावे अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा गंबीर इशारा मनसे नेते उमेश धांडेकर व दीपक कामठे यांनी दिला आहे .

Pune News , Maharashtra News , Vidarbha News


फोटो ओळ : ड्रेनेजचेंबर मधून दुर्गंधीयुक्त मैलापाणी वाहत असताना.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.