शेगाव (मनोजकुमार वर्मा)----
शेगांव तालुक्यातील 2 ते 3 वर्षापासुन तहसिल कार्यालयामध्ये नविन शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, विभक्त शिधापत्रिका बाबत अनेक अर्ज रखडलेले आहेत. त्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केला त्या रखडलेल्या नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. परंतु कार्यालयीन कर्मचारी नेहमी उडवाउडवीची उत्तरे देतात. सद्या रेशनकार्ड नाही. आल्यावर देवु, 8 दिवसाने या, उद्या किंवा परवा अशा प्रकारे हुलकावणी देण्यात येते.
अनेकांना वैद्यकीय कामासाठी, विविध योजनेसाठी रेशनकार्ड हे महत्वाचे आहे. अनेकांना रेशनकार्ड अभावी आरोग्य योजनेचाही फायदा झालेला नाही. परंतु तहसिल कार्यालयातील हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. तरी तहसिल कार्यालयाने या रखडलेल्या अर्जाची विल्हेवाट लावुन 10 दिवसाचे आत सर्वांचे रेशनकार्ड वाटप करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग स्विकारण्यात येईल. असे आवाहन अ.जा.काँग्रेस चे शेगांव तालुका अध्यक्ष अनिल सावळे यांनी एका निवेदनातुन केली आहे.

Post a Comment