चांदूर बाजार /---
स्थानिक चांदूर बाजार मधील
शिरजगाव बंड शिवारातील शिवाजीनगर येथे काल २ मे रोजी रात्री १२ नंतर एका ३0 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. मृत युवकाच्या शरीरावरील जखमा इतक्या भयंकर होत्या की त्याचा जागीच अंत झाला. संपूर्ण शरीर रक्ताने लालमय झाले होते युवकाचा मृतदेह शिवाजी नगरातील त्याच्या राहत्या घरासमोरच रस्त्यावर आढळून आल्याने त्याला घरातून बाहेर बोलावून त्याचे वर चाकुने सपासप वार केल्याची शक्यता पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आली.
सचिन जनार्दन मानकर (३0) हे त्या मृतकाचे नाव असून तो शिवाजी नगर येथे एकटाच राहत होता. २ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत या परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे परिसरातील लोक बाहेरच होते. ३ मे रोजी सकाळी ७ वाजता परिसरातील नागरिकांना सचिन त्याच्या घरासमोरील रस्त्यावर रक्ताच्या थारोळय़ात दिसला. या घटनेची माहिती गो.सी. टोम्पे महाविद्यालयातील प्रा. प्रशांत देवसळे यांनि चांदूर बाजार पोलिसांना दिली. माहिती मिळताच ठाणेदार श्री सुशील सिंग राजपुत सह पोलिस सहित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील नागरिकांची विचारपूस करून श्वान पथक व फॉरेन्सिक सायन्सच्या पथकाची मदत मागविली. श्वानपथक घटनास्थळावरून थोड्या अंतरावर गेल्यानंतर थांबले. त्यामुळे तपासाला दिशा मिळाली आहे. घटनास्थळावर मृताचा मोबाईल सापडल्याने तपासाला मोठी मदत मिळणार असल्याची माहिती ठाणेदार राजपुत यांनी दिली. कलम ३0२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत हा गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याने त्याच्या विरोधात अतुल रूपराव सिंघम हा बेलोरा येथील इसमाला चाकूहल्ला करून जखमी केल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ही घटना सन २0१0 मध्ये जयस्तंभ चौकात घडली.
सदर घटनेत एकापेक्षा अधिक आरोपी असून त्यांनी दुचाकीचा वापर केला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण पौनीकर यांनी घटनास्थळाला भेट दिली असून ठाणेदार श्री सुशिल सिंग राजपुत यांच्या नेतृत्वात एपीआय नंदकुमार काळे, एपीआय श्री सुधाकर अठूर व शिपाई राजु इंगळे यांचे पथक तपास करीत आहेत. फिर्यादी श्री अतुल बाबुराव कोकाटे यांचे तक्रारी वरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Wednesday, May 4, 2016
चांदूर बाजार - शिरजगाव बंड शिवारातील शिवाजीनगर येथे 30 वर्षीय युवकाचा खून
Posted by vidarbha on 4:43:00 AM in http://vidarbha24news.com/ | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment