चंद्रपूर / प्रवीण गोंगले /---
सततच्या वाघ मृत्युच्या घटनांनी चंद्रपूर वनविभाग हादरला आहे. ताज्या घटनेत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर (बाह्य) क्षेत्रात मोडणा-या डोनी या गावालगतच्या जंगलात वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मृत्युच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
अगदी महिनाभराची वाघ मृत्यूची ही आकडेवारी वन्यजीवप्रेमीना अस्वस्थ करणारी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल पट्टेदार वाघांसाठी समृध्द नैसर्गिक अधिवास समजला जातो. उत्तम खाद्य आणि बारमाही पाणवठे यामुळे वाघांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. जिल्ह्यातील जंगलात एकूण १०० वाघ असावेत असा एक अंदाज आहे. मात्र वाघ मृत्यूचा ताजा आकडा चिंताजनक ठरतो आहे. विशेष म्हणजे महिनाभरातील तीनही मृत्यू ताडोबाच्या बाह्य भागात झाले आहेत. आज पुन्हा एक वाघ मृतावस्थेत आढळला. डोनी गावातील ग्रामस्थांना याची माहिती मिळाली. वनविभागाची चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाली. वाघाचे सर्व अवयव शाबूत असून सुमारे २ दिवस आधी वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आणखी एका वाघाचा मृत्यू झालाय. आणखी एक अहवाल सादर होईल. मात्र त्यामागील कारणांवर कृतीचे काय होईल यावर प्रश्नचिन्ह आहे.
Post a Comment