धनबाद (झारखंड) -
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणार्पण करणारे भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे यांसारख्या वीरांनी स्वतंत्र भारताच्या ज्या स्वरूपाची कल्पना केली होती, त्याची उपेक्षा करण्यात येत आहे. हिंदूंना कपटाने अल्पसंख्यांक बनवण्याचा प्रयत्न सदैव होत आलेला आहे. व्यक्तीगत कायद्याचा (पर्सनल लॉचा) विचार केल्यास भारतात हिंदूंना समान अधिकार कुठे आहेत ?, असे प्रतिपादन पुरीच्या पूर्वाम्नाय पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी यांनी केले.
केंद्रशासनाने धैर्याने ठोस पावले उचलायला हवीत; जेणेकरून गाय, गंगा आणि सनातनी परंपरांचे रक्षण होऊ शकेल.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणार्पण करणारे भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे यांसारख्या वीरांनी स्वतंत्र भारताच्या ज्या स्वरूपाची कल्पना केली होती, त्याची उपेक्षा करण्यात येत आहे. हिंदूंना कपटाने अल्पसंख्यांक बनवण्याचा प्रयत्न सदैव होत आलेला आहे. व्यक्तीगत कायद्याचा (पर्सनल लॉचा) विचार केल्यास भारतात हिंदूंना समान अधिकार कुठे आहेत ?, असे प्रतिपादन पुरीच्या पूर्वाम्नाय पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी यांनी केले.
शंकराचार्यांनी नुकतेच धनबाद जिल्ह्यातील झरियामधील गोशाळेला भेट दिली. तेव्हा ते बोलत होते. शंकराचार्य पुढे म्हणाले,
महाराष्ट्र आणि हरियाणा शासनांनी गोरक्षा होण्यासाठी योग्य पावले उचलून कौतुकास्पद काम केले आहे.केंद्रशासनाने धैर्याने ठोस पावले उचलायला हवीत; जेणेकरून गाय, गंगा आणि सनातनी परंपरांचे रक्षण होऊ शकेल.
आज मुसलमान, ख्रिस्ती अथवा साम्यवादी यांच्यापेक्षा हिंदूच गोहत्येला
संरक्षण देत आहेत. स्वत:ला हिंदु म्हणवणारे मार्कंडेय काटजूच गोहत्येचे
समर्थन करतात, हे दुर्दैवी आहे.
शासनाच्या विकृत कृषी प्रणालींमुळे गोवंशाचा उपयोग आणि संरक्षण होऊ शकत
नाही. एकेकाळी आपल्या देशात ७० प्रजातींच्या गायी होत्या. आता केवळ ३०-३५
प्रजातींच्या गायी शिल्लक आहेत. आता केवळ आश्रम आणि गोशाळांमध्येच गोवंशाचे
संरक्षण केले जात आहे.
Post a Comment