बाळापूर/ अकोला /-

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर आज रविवारी दुपारी भरधाव टँकरने समोरून येणार्या मारुती सुझुकीला जबरदस्त धडक दिल्याने ४ वर्षीय बालिकेसह ५ जण जागीच ठार झालेत.
राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर ते तरोड्यादरम्यान असलेल्या मदरशानजिक एक टँकर (क्र. एम.एच. ४६ / एफ 0५४२) भरधाव खामगावकडे जात होता. त्याचवेळी समोरून येणार्या मारुती सुझुकी (क्र. डी. डी. 0३ ई २९0६)ला या टँकरने जोरदार धडक दिली. त्यामध्ये मारुती बर्याच अंतरापर्यंत फरफटत गेली. त्यामध्ये असलेले संतोषकुमार मुरलीधर कारंजावाला (४५), संगीता संतोषकुमार कारंजावाला (४0), यश संतोषकुमार कारंजावाला (१५) तिघेही रा. वापी, गुजरात आणि रंजना मुन्नुभाई नागट (३५) व एक ४ वर्षीय बालिका असे ५ जण जागीच ठार झालेत. बालिकेचे शिर धडापासून वेगळे झाले होते. धडक एवढी जबर होती की, मृतकांना गाडीबाहेर काढण्यासाठी गॅसकटरचा वापर करावा लागला

Post a Comment