चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--- -
तालुक्यातील प्रगतशील शेतकरी राजु उर्पâ विवेक वासुदेव चर्जन यांना राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
अमरावती येथे शिकची रिसोर्ड येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात खा.राजीव सातव यांच्या हस्ते राजु चर्जन व त्यांच्या कुटूंबाचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आ.यशोमती ठाकुर, आ.वीरेंद्र जगताप, जि.प.सदस्य सतिश उईके, माजी आ.सुलभाताई खोडके, संजय खोडके, अमरावती कृउबास उपाध्यक्ष किशोर चांगोले, निरीक्षक पोर्णीमाताई सवई, किशोर बोरकर, प्रकाश साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. राजु चर्जन यांनी आंतरशेतीचा प्रयोग यशस्वी केला. संत्रा बागेत श्री.चर्जन यांनी आठ फळांचा व विविध भाजीपाल्याचे पिक घेतले. त्यामध्ये आंबा, संत्रा, चिकु, फणस, रामफळ, सिताफळ ,पेरू, हनुमान फळ या फळांसह सर्व प्रकारच्या भाजीपाल्याचे भरघोष पिक घेतले. राजु चर्जन यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिंगल बेल इंग्लिश स्कुलचे संस्थापक अध्यक्ष दीपक डहाणे, निलेश विश्वकर्मा, मनोहर केने, मंगेश बोबडे, प्रशांत घाटोळ, अमोल चौकडे यांच्यासह शिव आरती मंडळ व माऊली परीवार बासलापुर यांनी स्वागत केले.
Post a Comment