अमरावती / - -

राज्यातील ६0 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मागील १५ वर्षांपासून अनुदानापासून वंचित असल्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांनी उभारलेला लढा शासनाला लेखी आश्वासन देण्यास बांधील ठरला होता. मात्र अर्थसंकल्प अधिवेशनाला ६0 दिवसांचा कालावधी उलटूनसुध्दा शासनाने आश्वासनाची पूर्तत: केली नसल्यामुळे ३१ मेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १ जूनपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष श्री शेखर भोयर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिला.
१५ वर्षांपासून ६0 हजाराच्यांवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनुदानापासून वंचित असल्यामुळे महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनदरम्यान राज्यस्तरीय पायी दिंडी व मोर्चा काढून शासनाला शिक्षकांची ताकद दाखविली होती. शिक्षकांचा आंदोलनाला वाढता पाठिंबा पाहता शासनाने लेखीस्वरूपात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ६0 दिवसांचा कालावधी उलटूनही शासनाने शिक्षकांच्या मागण्या पूर्ण केल्या नसल्यामुळे १ जूनपासून शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोरण बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीतर्फे देण्यात आले. यावेळी श्री शेखर भोयर, श्री पुंडलिक राहाटे, श्री एस.के. वाहूरवाघ, श्री सुरेश सिरसाट, श्री दीपक देशमुख आदी उपस्थित होते

Post a Comment