
चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-- -
तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेशी समजल्या जाणाऱ्या शिवकृपा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्थेच्या
निवडणूकीत शिवशक्ती परीवर्तन पॅनलचे १५ पैकी १३ संचालक बहूमतांनी निवडून आले. मात्र
पदाधिकारीयांच्या निवडणूकीत अध्यक्षपदावरून शिवशक्ती परीवर्तन पॅनलच्या संचालकामध्ये शिवाजी
संस्था व विदर्भ युथ वेलपफेअर संस्थेच्या शाळेमध्ये कार्यरत संचालकावरून उभी फुट पडली. त्यामूळे
पदाधिकारी यांची निवडणूक तिहिरी होऊन शिवशक्ती परीवर्तन पॅनलचे अनिल चौधरी अध्यक्षपदी व चंद्रशेखर
कडुकार सचिवपदी निवडून आले. तर बंडखोर गटाचा पराभव झाला.
शिवशक्ती शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक २४ एप्रिल रोजी पार पडली. या
निवडणूकीत शिवशक्ती परीवर्तन पॅनलने १४ जागा लढविल्या.१५ संचालकासाठी झालेल्या या निवडणूकीत
शिवशक्ती परीवर्तन पॅनलचे १३ संचालक निवडून आले. तर प्रतिस्पर्धी शिव विकास पॅनलला दोन जागा
मिळाल्या. पतसंस्थेच्या पदाधिकारी यांच्या निवडणूकीत अध्यक्षपदावर काही विशिष्ट संचालकानी दावा
ठोकल्यामूळे शिवशक्ती पॅनलमध्ये उभी फुट पडली. संचालकामध्ये शिवाजी शिक्षण संस्थाच्या शाळेमध्ये
कार्यरत व विदर्भ युथ वेलफेयर सोसायटीच्या शाळेमध्ये कार्यरत संचालक असे दोन गट पडले. १६ मे
रोजी शिवकृपा पंतसंस्थेच्या पदाधिकारीयाची निवडणूक पार पडली. अध्यक्षपदाच्या निवडणूकीत
शिवशक्ती परीवर्तन पॅनलचे अनिल मधुसूदन चौधरी ८ मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी शिव
विकास पॅनलचे अशोक तुळशीराम मोटघरे यांना एक मते तर शिवशक्ती परीवर्तन पॅनलचे बंडखोर गटाचे
सचिन प्रभाकर घारफळकर यांना ६ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिवशक्ती परीवर्तन पॅनलचे
यशोधन बापुराव बावणे ८ मते घेऊन विजयी झाले.तर शिवशक्ती परीवर्तन पॅनलचे बंडखोर गटाचे सचिन
घारफळकर यांना १ व सुधीर पिसे यांना ६ मते मिळाली. सचिवपदाच्या निवडणूकीत शिवशक्ती परीवर्तन
पॅनलचे चंद्रशेखर मधुकर कडुकार ८ मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी शिव विकास पॅनलचे उमेंद्र
रामराव ढगे यांना ६ मते मिळाली. सहसचिवपदाच्या निवडणूकीत शिवशक्ती परीवर्तन पॅनलचे प्रभाकर
शंकर वैद्य ८ मते घेऊन विजयी झाले. शिवशक्ती परीवर्तन पॅनलचे बंडखोर गटाचे समीर निवृत्तीराव ढेकेकर
यांना ६ मते मिळाली. या निवडणूकीत चंद्रशेखर कडुकार हे शिवशक्ती पॅनलला धरून राहिल्यामूळे शिवशक्ती
परीवर्तन पॅनलचा विजय झाला हे विशेष.
Post a Comment