प्रत्यक्षातही 'पंथनिरपेक्ष' हाच शब्द योग्य आहे, हे विरोध करणारे जाणतील का ?
पुणे,
- बालभारतीने प्रसिद्ध केलेल्या बालभारतीच्या मराठी विषयाच्या पुस्तकात 'धर्मनिरपेक्ष' असा शब्द आहे. हिंदी विषयांच्या पुस्तकातील संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्दाच्या ठिकाणी 'पंथनिरपेक्ष' असा शब्द प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे 'धर्मनिरपेक्ष' शब्द का वापरला नाही, असा प्रश्न उपस्थित करून शिक्षणक्षेत्रात उलटसुलट चर्चा चालू झाली आहे.याविषयी बालभारतीचे संचालक सुनील मगर म्हणाले की, बालभारतीकडून संविधानाच्या प्रस्तावनेचे भाषांतर करण्यात आलेले नाही. ४२ व्या घटना दुरुस्तीनुसार हा शब्द पालटण्यात आला आहे. बालभारतीच्या पुस्तकांमध्ये वर्ष २०१३ पासून 'पंथनिरपेक्ष' शब्दच वापरला जात आहे. त्यावरून वाद होण्याचे कोणतेही कारण नाही.
Post a Comment