अहेरी / रंगय्या रेपाकवार /---
- अहेरी तालुक्यातील कमलापूर-छल्लेवाडा मार्गावरील कोडसेलगुडम गावात नक्षल्यांनी सोमवारच्या मध्यरात्री कापडी बॅनर लावले. या बॅनरच्या मजकुरातून १ ते ३१ मे पर्यंत महिनाभर नागरिकांनी विस्थापन विरोधी जन आंदोलन तीव्र करावे, असे आवाहन नक्षल्यांनी केले आहे. भारत की कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) दक्षिण गडचिरोली असाही उल्लेख या बॅनरमध्ये आहे.
एटापल्ली तालुक्यातील नेन्डेर परिसरात नक्षलवाद्यांचे पत्रक आढळून आले आहेत. या पत्रकात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजनीतीकरणे बंद करा,चकमकीत मारल्या गेलेल्या महिला नक्षलवाद्यांना कोटी-कोटी सलाम आणि सुरजागड लोह प्रकल्पावर राजनीती करणाऱ्यां ढोंगी राजनीतिक दलालाला हाकलून लावा असे आव्हान नक्षलवाद्यानी पत्रकातून केले आहे.त्यामुळे या परिसरात दहशत पसरली आहे. पोलिसांच्या फेक एनकाउंटर आणि फेक सरेंडर वरही नक्सलवाद्यांनी ताशेरे ओढले आहे .
Post a Comment