श्री राहुल गुल्हाने/ नांदगाव खंडेश्वर /---
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तहसिल अंतर्गत येणाऱ्या नांदगाव खंडेश्वर अमरावती रोडने अवैधरीत्या लाकुड कटाई करून ट्रकने अमरावती येथील आरा मशीन मध्ये विक्री करीता सदर लाकूड नेल्या जात असल्याची गुप्त माहिती दिनांक 13/5/2016 रोजी तहसिल प्रशासनास प्राप्त झाली असता माहितीचे आधारे तहसिल प्रशासनाचे पथकाने सापळा रचून सावंगा फाट्यावर सदर ट्रक वाहन रोखुन चेक केले असता वाहनात लाकुड असल्याचे निदर्शनास आले वाहन चालकास लाकडाची परमिशन मागणी केली असता नसल्याचे आढळून आले त्या दरम्यान ट्रक चालकाने पथकाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला व धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार विरेंद्र भाऊ जगताप यांचा फोन येईल तेव्हा वाहन तहसिलला लावतो असे शब्द बोलुन वादविवाद करण्याचा प्रयत्न केला अखेर पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेत तहसिल प्रशासनाने सदर ट्रक तहसिल नांदगाव खंडेश्वर येथे आणला या प्रकरणी वृत्त लिहे पर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती
Post a Comment