राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) आरोपपत्रात साध्वी प्रज्ञासिंह यांचे नाव वगळण्यात आले, तसेच कर्नल पुरोहित यांच्या घरी आर्डीएक्स ठेवून त्यांना गोवण्यात आले होते, हे आज स्पष्ट झाले. गेली ७-८ वर्षे साध्वीजी आणि कर्नल पुरोहित यांना प्रचंड छळ सोसावा लागला. साध्वींना साधे उपचारही मिळू दिले नाहीत. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी संबंधित पोलीस अधिकार्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि त्यापुढे जाऊन भगव्या आतंकवादाचे षड्यंत्र रचणार्या सूत्रधारांवरही कारवाई करावी, अशी मागणी सनातन संस्थेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
१. भगव्या आतंकवादाचे षड्यंत्र आता उघड होत आहे. डेव्हीड हेडलीने इशरत जहाँ आतंकवादी असल्याचा खुलासा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्यांनी तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी प्रतिज्ञापत्रात फेरफार केल्याचे उघड झाले होते.
२. त्याचप्रमाणे मडगाव, गोवा येथे झालेल्या स्फोट प्रकरणी सनातन संस्थेला गोवण्याचा प्रयत्न केला होता.
३. मडगाव स्फोट प्रकरणी सनातनच्या सर्वच्या सर्व ६ साधकांना न्यायालयाने निर्दोष मुक्त करून हे षड्यंत्र उघडकीस आणले होते.
४. आज राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात काँग्रेसचे भगव्या आतंकवादाचे षड्यंत्र संपूर्णपणे उघडकीस आले.
५. या खटल्यात चुकीच्या पद्धतीने गोवलेल्या हिंदूंची नावे आरोपपत्रातून वगळल्यावर त्वरित काँग्रेसी नेत्यांनी शासनावर टीका करणे आरंभ केले; परंतु हे त्यांनीच केलेले पाप आता उघडकीस येत आहे.
६. मागच्याच आठवड्यात एन्आयएने २००६ मधील मालेगाव स्फोट प्रकरणातील ९ मुसलमान आरोपींना जेव्हा मुक्त केले, त्या वेळी मात्र सर्व पुरोगाम्यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. यातून त्यांचा दुटप्पीपणाच दिसून येतो.
७. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी शासनाच्या दबावामुळे हे सर्व घडले, हे उघड झाले आहे. भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी मालेगाव प्रकरणात निरपराध हिंदूंना किती खालच्या स्तरावर जाऊन गोवले गेले आणि अपकीर्त केले गेले, हे सत्य आता उघड झाले. या निर्दोष हिंदूंना त्यांच्या जीवनातील वाया गेलेली वर्षे काँग्रेसवाले परत कशी भरून देणार ? याचा खुलासा याला उत्तरदायी असणार्यांनी करावा, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी केली आहे.
Post a Comment