हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन उभे करण्याच्या उद्देशाने 19 जूनपासून गोवा राज्यात पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन प्रारंभ होत आहे. 25 जूनपर्यंत चालणार्या या अधिवेशनाला भारतातील 22 राज्यांसह नेपाळ आणि श्रीलंका येथील 161 हून अधिक हिंदु संघटनांचे 400 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित रहातील. यात सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सामायिक कृती आराखड्यांतर्गत वर्षभरातील उपक्रम आणि आंदोलनांची दिशा निश्चित करणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत असला, तरी हिंदूंच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, कलम 370 रहित करणे, गोवंश हत्या बंदी, राममंदिराचे पुनर्निर्माण आदी विषयांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे हिंदु संघटनांनी आता पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून निर्धार करण्यात येणार आहे. मागील 4 राष्ट्रीय अधिवेशनांत निश्चित झाल्यानुसार विविध विषयांवर आंदोलने घेण्यात आली असुन याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या पाचव्या अधिवेशनाद्वारे होईल. अशी माहिती अमरावती येथील हिंदु जनजागृती समिती चे अमरावती जिल्हा समन्वयक श्री नीलेश टवलारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे -पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन संदर्भात अधिक माहिती किवा अधिवेशन स्थळी पोहोचण्यासाठी कुठली अडचण निर्माण झाल्यास 7588545462 या भ्रमणध्वनि वर दूरभाष करावा
Post a Comment