मुंबई -
रामनाथी, गोवा येथे होणार्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाविषयी येथील मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि गेली ३ वर्षे सातत्याने हिंदू अधिवेशनात सहभागी होणारे हिंदुत्ववादी श्री. वैभव राऊत हे उपस्थित होते. प्रारंभी वैद्य उदय धुरी यांनी अधिवेशनाविषयी माहिती दिली. त्यानंतर इतरांनीही अधिवेशनाविषयी विचार मांडले. या वेळी अभय वर्तक म्हणाले, सध्या अनेक हिंदुत्ववादी संघटना विविध अडचणींतून जात आहेत. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये प्रत्येक हिंदुत्ववादी संघटनेच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत. या अधिवेशनात सहभागी होत असलेल्या प्रत्येक संघटनेचा उद्देश हिंदु राष्ट्राची स्थापना यासाठी परावर्तीत होत आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून प्रभावी हिंदूसंघटनासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या संघटनांच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य होत आहे. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये विविध विषयांवर चर्चा आणि कार्याचे नियोजन होत असल्याने हिंदुत्ववादी संघटनांची फलनिष्पत्ती वाढत आहे. अधिवेशनामध्ये जेवढ्या हिंदुत्ववादी संघटना सहभागी होत आहेत, त्यांमध्ये संघटनात्मक भावना जागृत होत आहे. सर्व हिंदुत्ववादी संघटनांना अधिवेशनाच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळत आहे.
अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हे हिंदु राष्ट्राच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने हे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन यशस्वी होत आहे.

अधिवेशनातून हिंदुत्वावरील आघातांच्या विरोधात
एकत्रित लढा देण्याचे बळ मिळते ! - श्री. वैभव राऊत
मला अधिवेशनाला उपस्थित रहाण्याची यावर्षी तिसर्यांदा संधी
प्राप्त होत आहे. अधिवेशनामध्ये शिस्तीचे पालन केले जाते. हिंदु धर्मावरील
आघात अधिवेशनाच्या माध्यमातून सर्व हिंदुत्ववादी संघटनांपुढे ठेवण्यात
येतात. या आघातांच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येते.
अधिवेशनाच्या माध्यमातून उपस्थित हिंदुत्ववाद्यांमध्ये प्रेमभाव निर्माण
होऊन संघटन वाढत आहे. गोहत्या बंदी कायदा, समान नागरी कायदा आदींसाठी
हिंदुत्ववादी संघटनांकडून एकत्रित प्रयत्न करण्यात येणार आहे. या
अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदुत्वावरील आघातांच्या विरोधात एकत्रित लढा
देण्याचे बळ मिळते.
Post a Comment