चांदूर बाजार/----
श्री संत गजानन महाराज सेवा समिति वतीने यवतमाळ जिल्हातील ताहिरनगर या ठिकाणी श्रीच्या पालखीवर काही विशिष्ट समाजातील 15 ते 20 च्या संख्येतील धर्मांधांकडून नियोजित हल्ला केला या हल्ल्याचा निषेध करून हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याबाबत तहसीलदार शिल्पा बोबडे यांना निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्रातून तसेच परराज्यातून आषाढी एकादशी निमित्य पंढरपूरसाठी मोठ्या प्रमाणात पालखींचे हरिनामाच्या गजरात प्रस्थान होत असते. वर्धा येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेली संत गजानन महाराज यांच्या पालखीवर नागपूर बायपासवर अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना दि. 20 जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये चार ते पाच वारकरी जखमी झाले. ते शहरातील लोहारा येथे मुक्कामी येत असताना ही घटना घडली. या घटणेमुळे कोट्यवधी भक्तांच्या भावना दुखावल्या आहे. या भ्याड हल्ला करणाऱ्या धर्मान्धांनवर कठोर कारवाई करावी व पंढरपूर येथे जाणाऱ्या सर्व पालख्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी श्री संत गजानन महाराज सेवा समितिचे श्री भाष्कर टोम्पे, श्री रवी पवार, श्री मदन तिरमारे,श्री बाळासाहेब भटकर, श्री रमेश इंगळे, श्री प्रमोद मांडवकर, श्री स्वप्नील देशमुख, श्री रोशन देशमुख, श्री विजय गणविर, श्री संजय गणविर,श्री प्रवीण वाटाणे, श्री नरेंद्र कावरे, श्री विजय कोंडे, श्री आकाश शिरभाते, प्रवीण मेहरे, अमोल गतफणे, श्री सुरेन्द्र ठाकरे, प्रा. श्री सुनील ढोले, गौरव ठाकरे, श्याम आजनकर तसेच श्री संत गजानन महाराज सेवा समिति चांदूर बाजार, डोमक, जैनपूर, हिरूळ पूर्णा, हैदतपूर वडाळा, शिरजगाव बंड, कुरळ पूर्णा, काटसुर, घाटलाडकी येथील सेवाधारी उपस्थित होते.
Post a Comment