म्हापसा, १६ जून (वार्ता.) -
बिलिव्हर्सवाल्यांनी चालवलेला खेळ थांबवावा अन्यथा शिवसेनेला तिच्या
पद्धतीने हे प्रकार रोखावे लागतील. गरीब, गरजू आणि श्रद्धाळू लोकांना हेरून
त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न शिवसेना कदापि सहन करणार नाही, अशी
चेतावणी गोवा शिवसेना नेते आनंद शिरगावकर यांनी दिली आहे.
म्हापसा येथे झालेल्या प्रकाराचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात
आला. शिवगावकर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गरिबांच्या
साधेपणाचा लाभ उठवून त्यांच्यावर बिलिव्हर्स त्यांच्या धर्माचा, त्या
विचारांचा प्रभाव पाडण्याचा आणि त्यांची फसवणूक करण्याचा धंदा करत आहेत. तो
प्रथम बंद करावा. स्वत:ला संतांची उपमा देऊन प्रार्थना आणि उपदेश देणे बंद
करावे.
Post a Comment