पुणे, १६ जून (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी संशयित
म्हणून अटक केलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची कोठडी १६ जून
या दिवशी संपल्याने त्यांना येथील केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या
(सीबीआयच्या) न्यायालयात उपस्थित करण्यात आले. या वेळी अन्वेषण विभागाचे
अधिवक्ता डी.बी. राजू यांनी डॉ. तावडे यांना आणखी ८ दिवसांची सीबीआय कोठडी
देण्याची मागणी केली; परंतु सनातनचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी या
मागणीला प्रखर विरोध दर्शवल्यामुळे न्यायमूर्ती व्ही.पी. गुळवे-पाटील यांनी
डॉ. तावडे यांना ४ दिवसांची, म्हणजेच २० जूनपर्यंत सीबीआय कोठडीत
ठेवण्याचा आदेश दिला.
शासकीय अधिवक्ता डी.बी. राजू यांनी सीबीआय कोठडी वाढीची मागणी करतांना म्हटले की, डॉ. तावडे हे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला अन्वेषणात सहकार्य करत नाहीत, तसेच ते १४ आणि १५ जून या दिवशी आजारी असल्याकारणाने त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी प्रविष्ट केले होते.

Post a Comment