विद्याधिराज सभागृह, रामनाथी, २४ जून (वार्ता.) - धर्मशिक्षण
हा आपला आरसा आहे. आधुनिक शिक्षण आम्हाला मांजर करते. जेव्हा आपल्याला
धर्मशिक्षण मिळते, तेव्हा आपण मांजर नसून सिंह आहोत, ही ओळख होते. आपण
सिंहासारखे धर्मरक्षणाचे कार्य करायला लागतो. धर्मशिक्षणातून एकतरी सिंह
घडला, तर पूर्ण जंगलामध्ये राज्य करण्यास तो एकटा पुरेसा आहे; म्हणून
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आवश्यक आहे.
धर्मशिक्षणामुळे आपले ब्राह्मतेज वाढते आणि आपल्याला स्वस्वरूपाची ओळख
झाल्यामुळे आपल्यात क्षात्रतेजही निर्माण होते, असे प्रतिपादन आसाम येथील
हिंदु सेवा मंचचे श्री. विश्वनाथ कुंडू यांनी अखिल भारतीय हिंदु
राष्ट्र-संघटक अधिवेशनात केले.
धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगतांना ते पुढे म्हणाले, ‘‘जेव्हा प्रभु श्रीराम रावणाचा वध करण्यास निघाले, तेव्हा त्यांनीही श्री दुर्गादेवीची पूजा केली होती. पांडव धर्माच्या बाजूने होते, तरीही त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे साहाय्य घेतलेच होते. आज पांडवांसारखे धर्मरक्षणाचे कार्य करतांना आपणही भगवंताला सोबत घेऊन धर्मकार्य केले पाहिजे.’’

Post a Comment