मुंबई - भाजपच्या मुंबईतील अल्पसंख्यांक मोर्च्याच्या वतीने
नुकत्याच हज हाऊस येथे आयोजित केलेल्या ‘इफ्तार पार्टी’त मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत अनेक नेते उपस्थित होते. मागील वर्षी
मुख्यमंत्री गोल टोपी घालून ‘इफ्तार पार्टी’त सहभागी झाले होते; परंतु या
वर्षी त्यांनी गोल टोपी घालण्याचे टाळले. हिंदुत्ववादी संघटनांच्या
दबावामुळेच मुख्यमंत्र्यांनी गोल टोपी घालण्याचे टाळल्याची चर्चा
नागरिकांमध्ये होती.
बजरंग दलाचे महाराष्ट्र प्रांत संयोजक
शंकर गायकर यांची फडणवीस शासनावर टीका
या प्रकरणी बजरंग दलाचे महाराष्ट्र प्रांत संयोजक शंकर गायकर यांनी
फडणवीस शासनावर जोरदार टीका केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी ‘फेसबूक’ या
सामाजिक संकेतस्थळावर ‘धर्म छोडा, लज्जा छोडी, कितने अपराध करोगे पाखंडी’
अशी कविता ‘पोस्ट’ केली आहे.
त्या कवितेमध्ये राज्याच्या अर्ध्याहून अधिक मंत्र्यांवर विविध प्रकारचे
आरोप असल्याचा संदर्भही आहे. त्या ‘पोस्ट’ला भाजप कार्यकर्त्यांच्या
सर्वाधिक आवड (लाइक्स) मिळाल्या आहेत.
Post a Comment