BREAKING NEWS

Friday, June 17, 2016

डॉ. दाभोलकर, कलबुर्गी आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या हे काँग्रेसचेच सुनियोजित षड्यंत्र ! - श्री. प्रमोद मुतालिक

हुब्बळ्ळी (कर्नाटक) -




येथे हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेस श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, सनातन संस्थेचे श्री. कुबेरगौडा एस्. कल्लनगौडर, हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता श्री. गुरुप्रसाद आणि धारवाड जिल्ह्याचे समिती समन्वयक श्री. अशोक भोज यांनी संबोधित केले. या वेळी बोलतांना श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, नरेंद्र दाभोलकर, एम्.एम्. कलबुर्गी आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या हे काँग्रेसचेच सुनियोजित षड्यंत्र आहे.
       यातील दोन हत्या काँग्रेसच्या सत्ताकाळात झाल्या असूनही काँग्रेसने त्यांचे खरे मारेकरी शोधण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही. या तिघांचे खरे मारेकरी शोधण्यासाठी भाजप शासनाने प्रामाणिकपणे शोधकार्य हातात घ्यायला हवे. पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही केंद्रातील भाजप शासनावर यासाठी दबाव आणणार आहोत.
       परिषदेला २० वर्तमानपत्रांचे पत्रकार आणि कर्नाटक राज्यस्तरीय आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांचे एकूण १२ प्रतिनिधी उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.