BREAKING NEWS

Thursday, June 16, 2016

सैराटसारखे आयुष्य उद्ध्वस्त न करता ईश्‍वर आणि राष्ट्र यांवर प्रेम करा !

 
सैराट चित्रपटातील कलाकारांना पहाण्यासाठी तरुणांचा 
गोंधळ आणि पोलिसांचा लाठीमार ! 
    सैराट हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाचे वेड तरुण पिढीला लागले आहे. मध्यंतरी चित्रपटातील कलाकार जेथे जातील, तेथे त्यांना पहाण्यासाठी तरुण पुष्कळ गर्दी करायचे. तेथे पोलिसांना लाठीमारही करावा लागायचा. नाशिक येथे तर त्यांना पहाण्यासाठी चेंगराचेंगरी झाली होती. चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट हे गाणे लागल्यावर चित्रपटगृहातच तरुण नाचू लागतात. यावरून या चित्रपटाने तरुणांना किती वेड लावले आहे, हे लक्षात येते.
समाजाची होेणारी अपरिमित हानी ! 
      आजची तरुणपिढी प्रेमाच्या नादात स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहे. आतापर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटांतून आंतरजातीय विवाहाचे पुष्कळ प्रसंग दाखवले आहेत. कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता प्रेमी युगुल पळून जाऊन विवाह करतात किंवा आत्महत्या तरी करतात, असे त्यात दाखवले जाते. एक दुजे के लिए हा हिंदी चित्रपट पाहिल्यानंतर विवाहास नकार दिल्याच्या कारणावरून तरुण आणि तरुणी यांनी आत्महत्या करण्याची संख्या लक्षणीय होती. चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते अशाच घटनांचा अपलाभ घेतात; मात्र अशा चित्रपटांमुळे तरुण पिढी आणि समाजाची अपरिमित हानी होती. ती केव्हाही भरून निघत नाही !
     सैराट हा चित्रपट पाहिल्यानंतर कोल्हापूर येथील कसबा बावडा येथे झालेल्या ऑनर किलींगच्या घटनेची चर्चा करण्यात आली. १६ डिसेंबर २०१५ या दिवशी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन आंतरजातीय विवाह करणारी बहीण मेघा (वय १९ वर्षे) आणि तिचे पती इंद्रजित कुलकर्णी (वय २८ वर्षे) यांना मेघाच्या २ सख्ख्या भावांनी धारदार शस्त्राने वार करून ठार केले होते. मेघाने घरातून पळून जाऊन विवाह केल्यानंतर ६ मासांतच हा प्रकार घडला होता. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. सैराट चित्रपटातील घटनाही याच्याशी मिळतीजुळती आहे. चित्रपटातील अभिनेत्रीला तिचा भाऊच ठार मारत असल्याचे दाखवले आहे.
     शाळा आणि महाविद्यालय येथे आर्ची आणि परशा यांचेच भूत तरुणांच्या मानगुटीवर बसलेले आहे. सैराट पाहून मुले-मुली तशीच वागू लागली, तर त्याला उत्तरदायी कोण ? प्रेम करणारे तरुण आणि तरुणी यांनी आत्महत्या केल्यावर अथवा त्यांची हत्या केल्यानंतर त्याचा परिणाम थेट कुटुंबावर होतो. कुटुंबांतील लोकांना त्याचा पश्‍चात्ताप होतो, असेही चित्रपटात दाखवण्यात येते. कोल्हापूर येथील घटनेतही प्रतिष्ठेला धक्का बसल्याच्या विचारातून गणेश आणि जयदीप पाटील यांनी रागाच्या भरात बहिणीसह तिच्या पतीचा खून केला; मात्र यानंतर त्या दोघांना तर अटक झालीच आणि मुलीचाही जीव गेला. आई-वडिलांना आधार तरी कुठला ? अशी अनेक उदाहरणे असतील. 
     जळगाव येथेही आम्ही तुमच्या मुलींना पळवून त्यांचा सैराट करू, अशा भाषेत धमकी देत दोन टवाळखोरांनी मुलीच्या आईला मारहाण केली. सातारा आणि बीड येथेही सैराटप्रमाणे दोेन मुलांनी मुलींना पळवून नेऊन त्यांच्याशी विवाह केला आहे. या चित्रपटाने ८० कोटी रुपयांचा व्यवसाय केला असला, तरी या चित्रपटाचे तरुण पिढीवर दूरगामी परिणाम होऊ लागले आहेत. ते कोण थांबवणार, असा प्रश्‍न निर्माण होतो. 
आंतरजातीय चित्रपटांवर बंदी घालणे आवश्यक ! 
     सैराटसारख्या चित्रपटांमुळे समाजस्वास्थ धोक्यात येत असल्याने आणि त्याचा परिणाम तरुण पिढीवर होत असल्यामुळे असे चित्रपट प्रदर्शित करण्यावर शासनाने बंदी घातली पाहिजे; मात्र हे अशक्य आहे; कारण शासनाकडूनच सैराट चित्रपटातील अभिनेत्री आर्ची म्हणजे रिंकू राजगुरु हिला आंतरजातीय विवाहाचे ब्रॅन्ड अ‍ॅबेसिडर करण्यात आले आहे ! त्यामुळे शासन अशा चित्रपटांवर बंदी घालेल, अशी आशा करणे व्यर्थ आहे. समाजातील प्रतिष्ठित लोक, हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू यांनीच संघटित होऊन अन् समाजाला जागृत करून अशा चित्रपटांवर बहिष्कार घालण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. 
समाजात नैतिकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा ! 
     सैराटसारखे चित्रपट पाहून आणि तशा प्रकारे कृती करून समाज रसातळाला जात आहे. अनैतिकता वाढत आहे. त्यामुळे समाजात नैतिकता निर्माण करण्यासाठी तरुणांनी समाजातील समस्या दूर करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. क्रांतीकारकांनी राष्ट्रावर प्रेम करून देश स्वातंत्र्य होण्यासाठी स्वतःचे बलीदान केले. त्याप्रमाणे तरुण आणि तरुणी यांनीही राष्ट्रावर प्रेम करून राष्ट्रहितार्थ झटले पाहिजे. मुले-मुली एकमेकांवर प्रेम करतात, त्याऐवजी त्यांनी तसे प्रेम ईश्‍वरावर करून साधना केल्यास त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊन आयुष्याचे कल्याण होईल. केवळ प्रेमबंधनात अडकण्यापेक्षा ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय निश्‍चित करून त्या दिशेने वाटचाल करायला हवी. - श्री. सचिन कौलकर, कोल्हापूर

 ---------------------------
poly Admission 2016
http://poly2016.dtemaharashtra.gov.in/StaticPages/HomePage.aspx

www.dtemaharashtra.gov.in/poly2016

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.