नवी देहली - निवडणुकीत दिलेली
आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे शासन समान नागरी कायदा
करण्याच्या नावावर देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असा
आरोप एम्आयएम्चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.
एन्आयएने (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने) भाग्यनगर येथून अटक केलेल्या
५ मुसलमान युवकांची पाठराखण करतांना ओवैसी म्हणाले, मुंबई आक्रमणातील दोषी
अजमल कसाबलाही कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून देण्यात आले होते. आमच्या
लोकशाही प्रणालीमध्ये सर्व आरोपींना कायदेशीर साहाय्य मिळवण्याचा अधिकार
आहे आणि आमची न्याययंत्रणा अशा प्रकारे काम करते. न्यायालय ठरवेल की, हे
युवक दोषी आहेत कि निर्दोष. एन्आयएकडून अटक करण्यात आलेल्या युवकांना
न्यायालयाने निर्दोष ठरवले, तर अटक करणार्या अधिकार्यांना निलंबित केले
पाहिजे, असेही ओवैसी म्हणाले.
Post a Comment