चांदूर रेल्वे / शहेजाद खान /---
चांदूर रेल्वे तालुक्यातील थुगाव इसापुर येथील एका इसमाचा विजेच्या धक्याने मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. रामेश्वर लालाजी कारपाते (वय ४५) असे त्या दुर्दैवी इसमाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की थुगाव रहिवाशी रामेश्वर लालाजी कारपाते (वय ४५) हे घरी विद्युत पुरवठा सुरू करीत असतांना अचानक त्यांना विजेचा धक्का लागल्याने दूर फेकल्या गेले. विजेचा जोरदार धक्का लागल्याने ते बेशुध्द पडले. त्यांना लगेच अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले असता त्यांना मृत घोषीत केले. गावातील बंटी मोकळे यांनी त्याला दवाखान्यात त्वरीत नेऊन त्यांचे प्राण वाचविण्याचे पुरेपुर प्रयत्न केले मात्र यश आले नाही. रामेश्वर यांची घरची स्थिती नाजुक असुन मोलमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीता होता. त्याच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. रामेश्वर यांच्या अपघाती जाण्यामूळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment