BREAKING NEWS

Monday, September 19, 2016

पाकिस्तानच्या हिरव्या नांग्या ठेचून काढा ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

कोल्हापूर- आपल्या देशात प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांसह अनेकांनी युद्ध करूनच विजय मिळवला आहे. आता आम्हाला शासनाला सांगावे लागते की, युद्ध करा. पंतप्रधानांनी त्यांना ही खुर्ची अखंड हिंदुस्थानसाठीच मिळाली आहे, हे लक्षात ठेवावे. आमचे सैनिक पाकिस्तानला नष्ट करण्यासाठी जन्माला आले आहेत. अजून किती काळ आम्ही केवळ सैनिकांना श्रद्धांजलीच वाहायची ? आता पाकिस्तानच्या हिरव्या नांग्या ठेचून काढण्याची वेळ आली आहे, असे परखड मत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी व्यक्त केले. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. त्या वेळी श्री. वर्तक बोलत होते. पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी काश्मीर येथील लष्करी तळावर आक्रमण करून १८ सैनिकांचा बळी घेतला. त्याची संतप्त प्रतिक्रिया कोल्हापूर येथे उमटली आणि राष्ट्रप्रेमींनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. हिंदु एकता आंदोलनाचे सर्वश्री चंद्रकांत बराले, अण्णा पोतदार, जयदीप शेळके, शिवाजीराव ससे, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अशोक रामचंदानी, हिंदु धर्माभिमानी श्री. संग्राम घोरपडे, श्री. विक्रम धर्माधिकारी, पतितपावन संघटनेचे श्री. आकाश नवरूखे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मधुकर नाझरे, बाबासो भोपळे, किरण दुसे, प्रसाद कुलकर्णी, अजिंक्य पाटील, रणरागिणीच्या सौ. अंजली कोटगी, सौ. राजश्री मोरे, सौ. अनिता करमळकर, सनातन संस्थेचे श्री. अजय पाटील, श्री. कृष्णा बाबर, श्री. अमित हावळ, श्री. अजित सुस्वरे यांसह ५० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
अन्य मान्यवरांनी व्यक्त केलेली मते
१. श्री. शिवानंद स्वामी, हिंदु जनजागृती समिती - वर्ष १९४७ पासून पाकिस्तान भारताचा शत्रू आहे. युद्धात जेवढे सैनिक मारले गेले, त्यापेक्षा अधिक सैनिक आतंकवादी आक्रमणात मारले गेले. पाकिस्तानवर आक्रमण करायला हवे. आतंकवाद कसा संपवावा, याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासमोर ठेवला आहे. त्याप्रमाणे आता शासनाने कृती करण्याची वेळ आली आहे.
२. अधिवक्ता सुधीर जोशी-वंदूरकर, विश्‍व हिंदु परिषद - कालचे आक्रमण हे धर्मांधांनी हिंदूंवर केलेले आक्रमण आहे. धर्मांध पाकिस्तानातून येऊन आक्रमण करत आहेत. भाजपला बहुसंख्य हिंदूंनीच निवडून दिले आहे, हे पंतप्रधानांनी लक्षात ठेवावे.
३. डॉ. अविनाश शिंदे, श्रीशिवप्रतिष्ठान - धर्मनिरपक्षतेचे धोरण कुचकामी ठरले आहे. आता हिंदु राष्ट्रच घोषित करावे.
४. श्री. संजय कुलकर्णी, हिंदु महासभा, प्रदेश उपाध्यक्ष - भारतात आतंकवाद का फैलावतो, हे शोधणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समिती प्रत्येक आंदोलन देशहितासाठीच करते.
५. श्री. अवधूत भाट्ये, वन्दे मातरम् यूथ ऑर्गनायझेशन - पाकिस्तान हा प्रत्येक आतंकवादी आक्रमणामागे असतो, हे उघड झाले आहे. पंतप्रधानांनी आता एकदाचा काय तो पाकिस्तानला धडा शिकवावा.
६. श्री. सुनील पाटील, पतित पावन संघटना, जिल्हाध्यक्ष - जे सैनिक हुतात्मा झाले, ते सर्व हिंदु होते. अन्य धर्मीय येथेच रहातात, येथेच खातात; मात्र त्यांना भारतमाता की जय म्हणण्यास लाज वाटते. हे कधी राष्ट्ररक्षणासाठी एकत्र येत नाहीत.
७. श्री. शरद माळी, श्रीशिवप्रतिष्ठान - पाकड्यांना धडा शिकवा. आता गावागावांत अशी आंदोलने होणार आहेत.
क्षणचित्रे
१. अधिवक्ता सुधीर जोशी-वंदूरकर यांनी हुतात्मा झालेल्या सैनिकांची नावे वाचून दाखवली. त्या वेळी सर्वांनी जय श्रीराम अशी घोषणा दिली.
२. वीर जवानांचा विजय असो !, मुर्दाबाद-मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद ! जला दो, जला दो, पाकिस्तान जला दो !, अशा घोषणा देण्यात आल्या, तर नको निषेध, नको श्रद्धांजली, आता करा थेट कारवाई !, नष्ट करा, नष्ट करा, पाकिस्तान नष्ट करा !, मोदीजी युद्ध करा, युद्ध करा !, अशी वाक्ये लिहिलेले फलक हातात धरण्यात आले होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.