वडगावशेरी/---
"माणुसकीची भिंत" उपक्रम आता शाळेपर्यंत पोहचला .शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध व्हावे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे हे साहित्य पडून आहे त्याचा गरजू विद्यार्थ्यांना फायदा व्हावा. या उद्देशाने शिवराज विद्यालयाने हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दर शनिवारी सकाळी शाळा भरल्यानंतर शाळेकडून या भिंतीजवळ ठेवण्यात आलेल्या वस्तुंचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते असे संस्थेचे सचिव गीता साळुंके यांनी सांगितले.
शाळेच्या भव्य पटांगणावर प्रवेशद्वारा समोरच्या भिंतीला माणुसकीची भिंत म्हणून नामकरण करण्यात आले. ही भिंत आकर्षक पद्धतीने रंगवण्यात आली आहे.
ह्या भिंतीला टेकून टेबल ठेवून आठवड्यातील शनिवारी हा उपक्रम राबविला जातो.या दिवशी येणारे विद्यार्थी आपल्याकडे असलेले अधिकचे साहित्य कँम्पास बाँक्स,वाँटरबँग,पेन,पेन्सिल, पँड,बूट,साँक्स इत्यादी वस्तू टेबलावर आणून ठेवतात. ज्या विद्यार्थ्यांना यातील ज्या साहित्यांची आवश्यकता आहे ते विद्यार्थी त्या साहित्याची विद्यार्थ्यांना वाटणी करत असतात. ह्या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका अरुणा मोरे,मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे ,विनायक काकडे,गणेश निर्मळ, संजय मोरे, गजेंद्र केदार, अनिल वाळके,शिवाजी पवार, ज्ञानेश्वर भुजबळ प्रयत्नशील असतात.
Post a Comment