काकर समाजाचा राष्ट्रीय मेळावा नुकताच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला श्रीरामपुरचे आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुताई अदिख, मुस्लीम काकर समाजाचे कैनेडा येथील शेख साजीद काकर आदींची मंचावर प्रामुख्याने उपस्थीती होती. चांदुर रेल्वे येथील मोहम्मद अनिस सौदागर यांनी मुस्लीम काकर समाजाचे महाराष्ट्रात प्रथम जात वैधता प्रमाणपत्र बनविले. तसेच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात समाजासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. याचीच दखल घेवुन त्यांना या श्रीरामपुर येथील मेळाव्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते "समाज रतन" अर्वाडने सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात संपुर्ण भारतातील काकर समाजाचे बांधव प्रामुख्याने उपस्थिती होते.
त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांच्यावर जिल्हातुन कौतुकांचा वर्षाव होत आहे..
Post a Comment