ठाणे –
स्वा. सावरकरांचे विचार कृतीत आणले असते, तर हिंदुत्वाकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धैर्य झाले नसते. जाती-पातींमध्ये विभागलेला समाज हे देशासमोरचे मोठे आव्हान आहे. लोकांना जाती-पातीमध्ये अडकवून हिंदूंमध्ये फूट पाडली जात आहे. जाती-पातीमध्ये न अडकता हिंदु धर्मियांवर होणारे आघात रोखण्यासाठी एक हिंदु म्हणून एक व्हा, असे आवाहन नुकतेच श्री. शरद पोंक्षे यांनी ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात केले.
सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने नुकतेच येथील सिद्धीविनायक मंदिराच्या पटांगणावर आयोजित केलेल्या सुयश व्याख्यान मालेच्या कार्यक्रमात श्री. पोंक्षे बोलत होते. स्वा. सावरकर विचार दर्शन या विषयावर बोलतांना श्री. पोंक्षे म्हणाले, या देशात गांधी आणि पंडित नेहरु यांना मोठे करायच्या नादात शौर्याचा इतिहास गाडला गेला. आतापर्यंत देश गांधीजींच्या विचारसरणीने चालवला आता स्वा. सावरकरांच्या विचारसरणीने चालवून बघा. स्वा. सावरकरांचे विचारच देशाला पुढे नेतील. काँग्रेस सरकारने क्रांतिकारकांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही, अशी खंत श्री. पोंक्षे यांनी या वेळी व्यक्त केली.
Post a Comment