ज्यांनी हिंदूंना राममंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते, जो हिंदू इतकी बात करेगा, वोही देश पे राज करेगा । असे सांगणार्यांच्या राज्यात असा निर्णय होणे दुर्देवी आहे. लहान मुलांवर संस्कार कसे होणार ?, शासकीय पूजेवर बंदी येणार ?, हळदीकुंकू यांवर बंदी येणार. सैनिकही शक्तीची, हनुमानाची पूजा करतात. हज यात्रेला अनुदान देणारे सरकार, मदशांना अनुदान देणारे सरकार, इस्त्रोच्या ठिकाणी पूजा केली जाते हे लक्षात घेणार का ?
श्री विठ्ठलाची शासकीय पूजा २ वर्षे बंद केल्यावर १९७२ चा भीषण दुष्काळ पडला होता, ही लोकांची भावना आहे. नवरात्रामध्ये रात्री १० नंतर ध्वनीक्षेपकाला बंदी आहे; मात्र लेडीज बार चालू आहेत. सरकारची वाटचाल विनाशकाले विपरीतबुद्धिः । या दिशेने चालू आहे. शिवसेनेला विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. हा तुघलकी आदेश आहे.
केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का केले जाते ? मशीद किंवा चर्च सरकारने कह्यात घेतली आहे का ? सरकारने हिंदूंची मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्यावीत, अशी आमची मागणी आहे. मंत्रालयात सातव्या मजल्यावर नमाज पढला जातो, यासाठी जीआर् काढला होता, अशी वृत्ते होती. याविषयी शिवसेनेच्या नेत्यांनी आवाज उठवल्यावर घटना उघड झाली होती. उत्तराखंडच्या सरकारने शासकीय वेळेत नमाज पढण्याची सुविधा देण्यासाठी जीआर् काढला आहे. या गोष्टी शासनकर्त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे.
Post a Comment