चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-
तालुक्याच्या राजकारणातील काँग्रेस व त्यांच्या
विरोधातील शिवसेना-भाजप हे पक्ष सोडल्यास इतर पक्षांची स्थिती फारच केविलवाणी आहे. यामध्ये विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थिती. या पक्षाने नवे नेतृत्व, नवे लोक जोडलेले नाहीत; त्यामुळे या पक्षाची खुराडी बनली, लोक तुटले आणि फक्त पक्षाचे बॅनर्स व नेते राहिले, असा अनुभव येत आहे.
चांदुर रेल्वे तालुक्याच्या राजकारणात काँग्रेस, शिवसेना व भाजप या प्रमुख पक्षांचे अस्तित्व राजकारणात आहे. या पक्षांची स्थिती बरी, तर राष्ट्रीयकृत पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची तालुक्यात स्थिती दयनीय आहे. लोकांना आपला विचार ते पटवून देऊ शकलेले नाहीत. सत्तेच्या साठमारीत ताकद कमी पडत असल्याने पक्ष आणि कार्यकर्तेही जिवंत ठेवणेही अवघड बनले आहे. नुकत्याच झालेल्या नगर परीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुर्णत: बैकफुटवर गेला. कारण एकाही जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडुन आलेला नाही तर विजयाच्या जवळपासही कोणत्याही उमेदवाराला येता आले नाही. त्यामुळे शहरातुन सध्यस्थितीत राष्ट्रीयकृत असलेला राष्ट्रवादी पक्ष अस्तीत्वहीन होतांना दिसत आहे. शहरात राष्ट्रवादीचे केवळ नेते उरलेले आहे. तसेच जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुकीत सुध्दा कोणी इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीकडुन समोर येतांना दिसत नाही आहे. तालुक्यात कॉंग्रेस पक्षाने आमदार विरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात नगर परीषदनंतर आता पंचायत समिती, जिल्हा परीषद निवडणुकही स्वबळावर लढविण्याची तयारी दर्शवली आहे. नगर परीषद निवडणुकीत कॉंग्रेसने स्वबळावर निवडणुक लढवुन दणदणीत विजय प्राप्त केला व राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपली जागा दाखवून दिली. यावरून आता जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुक तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर लढविणार की नाही हे सुध्दा सांगणे कठीण झाले आहे..
Sunday, January 22, 2017
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तालुक्यातुन होत आहे अस्तीत्वहीन कार्यकर्ते गायब, उरले केवळ पक्षाचे बॅनर्स व नेते
Posted by vidarbha on 5:33:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment