परभणी / मोईन खान /-
पिंगळी जिल्हापरिषद गटातील तटटूजवळा येथील शिवसेना व युवासेनेतील कार्यकर्त्यांनी आज परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
यामध्ये अंकुश शिवाजीराव कदम पाटील, युवसेना उपशाखा प्रमुख तुकाराम कदम,अरुण कदम,सोपान कदम,अशोक कदम,माधव कदम,हनुमान कदम,विकास कनकुटे,अशोक ढगे आदीने भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
या प्रवेशामुळे पिंगळी जिल्हापरिषद गटामधील भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.यामुळे पक्षाची ताकद या गटामध्ये वाढण्यास मदत होणार आहे.
यावेळी भाजपा ग्रामीण सरचिटणीस बाबासाहेब फले,महानगर सरचिटणीस संजय शेळके,भाजपा कार्यकारिणी सदस्य डॉ.भिकुदास लाटे,भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब भालेराव,ब्रम्हानंद सावंत,बाळूकाका गरुड,पंचायत समिती सदस्य कृष्णा भरोसे,सावंगी सरपंच गुलाबराव पंढरकर,युवा तालुकाध्यक्ष अजित गरुड,भाजपा उपतालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे,संदिप जाधव,कुंडलिकराव लांडगे,निवृत्ती वैद्य,विश्वनाथ नवघरे,टाकळी बोबडे उपसरपंच कृष्णा बोबडे,प्रल्हादराव रेंगे,रवी कदम,प्रभाकर कदम,राहुल कनकुटे,बाळू कदम,अजित गरुड,अरुण कदम,रामप्रसाद कऱ्हाळे,बंडु झाडे,मुरली टोंग,गजानन भरोसे,पपू खुळे,प्रविण गायकवाड,विशाल बोबडे आदी उपस्थितीत होते.
Wednesday, January 18, 2017
शिवसेना व युवासेनेतील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश
Posted by vidarbha on 7:39:00 AM in परभणी / मोईन खान /- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment