कोल्हापूर–
श्रीक्षेत्र काशीचा अवमान करणार्या मोहल्ला अस्सी आणि पाक कलाकार यांची भूमिका असलेला रईस हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तरी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित करू नये, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अयोध्या चित्रपटगृहाचे व्यवस्थापक सर्वश्री विजय पोवार आणि पार्वती मल्टिप्लेक्सचे व्यवस्थापक अमर कारंडे यांना १३ जानेवारीला निवेदन देण्यात आले. सर्वश्री विजय पोवार आणि अमर कारंडे यांनी चित्रपटगृहाच्या मालकांना याची माहिती देऊन चित्रपट रहित करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे सर्वश्री शिवाजीराव ससे, हिंदु जनजागृती समितीचे गोविंद देशपांडे, देवराज सहानी, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, रणरागिणी शाखेच्या सौ. साधना गोडसे, सौ. सरस्वती मिराशी, सौ. विजया वेसणेकर, सनातन संस्थेच्या सौ. नंदिनी कुलकर्णी, सौ. सुधा बिलावर आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
Post a Comment