नागपूर - मुबईसाठी दोन महामार्ग आहे. मग तिसरा महामार्ग कशासाठी? त्या महामार्गात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन शेतकऱ्यांना भीकेला लावणे हा कोणता विकास आहे. त्या दोन मार्गावर अजुन सुधारणा केल्या असत्या तर हजारो शेतकरी भुमीहीन झाले नसते. जेथे जेथे प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या उदा. बेंबळा प्रकल्प लोअर वर्धा प्रकल्प या शेतकऱ्यांनचे हाल काय झाले हे आपल्या डोळ्यासमोर आहेत. ते प्रकल्पग्रस्त अजूनही मूलभूत सुविधापासून वंचीत असल्याचे डॉ. पांडुरंग ढोलेंनी व्यक्त केले. अशा ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना भिकारी करून मूठभर श्रीमंतांचा विकास करणाऱ्या
शासनाचा जनता दल(से) निषेध केला आहे.
Post a Comment