अ.भा.ग्रा. पत्रकार संघटनेची कार्यकारीणी गठीत तालुकाध्यक्षपदी गुड्डु शर्मा, उपाध्यक्षपदी प्रशांत कांबळे तर सचिवपदी प्रा. रविंद्र मेंढे
Posted by
vidarbha
on
5:36:00 PM
in
चांदुर रेल्वे- शहेजाद खान /--
|
चांदुर रेल्वे- शहेजाद खान /--
विविध प्रश्नावर लेखणीद्वारे आवाज उठवणे, सामाजिक कार्याला प्रसिद्धी देऊन योग्य न्याय देण्याचे काम पत्रकार अखंडितपणे करत असतात. जनतेचा आणि लोकशाहीमधीलदुवा म्हणून पत्रकारांकडे बघितले जात आहे. याच पत्रकारांची तालुका कार्यकारीणी शनिवारी २१ जानेवारी रोजी गठीत करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी गुड्डु शर्मा, उपाध्यक्षपदी प्रशांत कांबळे, धिरज नेवारे तर सचिवपदी प्रा. रविंद्र मेंढे, कोषाध्यक्षपदी मनिष खुने यांची निवड करण्यात आली.

शनिवारी कुऱ्हा रोड येथील दिपक गोरडे यांच्या वाडीत अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाची वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार प्रभाकरराव भगोले तर प्रमुख पाहुणे म्हणुन तळेगाव येथील जेष्ठ पत्रकार वसंतराव कुळकर्णी, कुऱ्हा येथील जेष्ठ पत्रकार अशोकराव पवार हे होते. या बैठकीमध्ये अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाची नवीन कार्यकारीणी गठीत करण्यात आली. यामध्ये पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, उपाध्यक्षपदी प्रशांत कांबळे, धिरज नेवारे, सचिवपदी प्रा. रविंद्र मेंढे तर कोषाध्यक्षपदी मनिष खुने यांची जेष्ठ पत्रकार उत्तमराव गावंडे यांनी सुचविल्याप्रमाणे सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सदस्यांमध्ये प्रभाकरराव भगोले, उत्तमराव गावंडे, युसुफ खान, बाळासाहेब सोरगिवकर, संजय मोटवानी, अभिजीत तिवारी, विनय गोटेफोडे, मंगेश बोबडे, इरफान पठान, विवेक राऊत, मधुकर बावने, अमर घटारे, प्रा. सुधिर तायडे, प्रा. प्रसेनजित तेलंग, अजय गावंडे, शहेजाद खान, हनुमंत मेश्राम यांचा समावेश आहे. यावेळी प्रभाकरराव भगोले, मावळते तालुकाध्यक्ष श्री अमोल गवळी, नवीन तालुकाध्यक्ष गुड्डु शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीमध्ये जेष्ठ पत्रकार उत्तमराव गावंडे यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांचा सहपत्नी शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यासोबतच नवनियुक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कारसुध्दा करण्यात आला.

यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी, अरूणराव शेळके, प्रा. अलटकर, प्रा. धामंदे, प्रा. पुतळे आदी शहरवासी़यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.
Post a Comment