हा अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह निर्णय आहे. हिंदु जनजागृती समितीकडून रस्त्यावर उतरून याला विरोध केला जाईल. या निर्णयामुळे हिंदु संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड आहे. सरकार म्हणते आम्ही निधर्मी आहोत, तर पंढरपूरला मुख्यमंत्र्याच्या हस्ते शासकीय पूजा का केली जाते ? ही पूजा प्रथम बंद करणार का ? सरकारने धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली शासकीय खर्चाने इफ्तार पार्ट्या का चालू ठेवल्या आहेत ? त्या बंद करण्याचा निर्णय प्रथम घ्यावा. शासनाकडून महापरिवर्तन दिनाला जेवण का दिले जाते ?
केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का केले जाते ? मशीद किंवा चर्च सरकारने कह्यात घेतली आहे का ? सरकारने हिंदूंची मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्यावीत, अशी आमची मागणी आहे. मंत्रालयात सातव्या मजल्यावर नमाज पढला जातो, यासाठी जीआर् काढला होता, अशी वृत्ते होती. याविषयी शिवसेनेच्या नेत्यांनी आवाज उठवल्यावर घटना उघड झाली होती. उत्तराखंडच्या सरकारने शासकीय वेळेत नमाज पढण्याची सुविधा देण्यासाठी जीआर् काढला आहे. या गोष्टी शासनकर्त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे.
Post a Comment