सोयाबिन अनुदानासाठी ३१ जानेवारी पर्यंत अर्ज दाखल करा
चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवाहन
चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--
राज्य शासनाने सोयाबिन उत्पादक शेतकNयांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ क्विंटल पर्यंत विक्री केलेल्या शेतकNयांना अनुदान देण्याचे जाहिर केले आहे. या बाबत शेतकNयांना आवश्यक ते कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे. १ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत बाजार समितीमध्ये सोयाबिन विक्री केलेल्या शेतकNयांना प्रति क्विंटल २०० रूपये जास्तीत जास्त २५ क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणे अनुदान मंजुर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वरील कालावधीत सोयाबिन विक्री करणाNया शेतकNयांना अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी विक्री केलेल्या शेतमालाची विक्रीपट्टी यासह सातबारा व बँकेचे पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स प्रतीसह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात ३१ जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.
Post a Comment