Wednesday, January 18, 2017
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ जानेवारीला
Posted by vidarbha on 7:43:00 AM in पुणे | Comments : 0
पुणे–
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ जानेवारी या दिवशी होणार आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील खटल्यात आरोप निश्चिती करण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या १६ नोव्हेंबर २०१६ च्या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) मुंबई उच्च न्यायालयात ८ डिसेंबर २०१६ या दिवशी अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर उच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती ‘सीबीआय’ने केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने ‘या अर्जावरील सुनावणी जानेवारी मासाच्या तिसर्या आठवड्यात होईल’, असे जिल्हा न्यायालयाला सांगण्याचे तोंडी आदेश दिले होते. त्यामुळे १७ जानेवारी या दिवशी होणारी सुनावणी पुढे ढकलावी, असा अर्ज ‘सीबीआय’ने जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सादर केला. ‘सीबीआय’च्या या अर्जावर सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या अधिवक्त्या नीता धावडे यांनी उत्तर दिले की, ‘उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या खटल्यावर स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे खटला चालवण्यात यावा.’ त्यावर जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ जानेवारी या दिवशी ठेवली असल्याचे सांगितले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment