जिंतुर / मोईन खान /-
या बाबत निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि.21 जानेवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास सेलू तालुक्यातील पावडे हदगाव येथील विजयकुमार शाळिग्राम पावडे या सदगृहस्थाची शेतीच्या क्षुल्लक कारणावरून अमानुषपणे हत्या करण्यात आली. संजय बोकेफोड व त्याच्या इतर साथीदारांनी संगणमताने हत्याकांड घडवून आणले. या हल्ल्यात विजयकुमारजी यांचा मुलगा अंगद पावडे हा देखिल गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर परभणीतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या हत्याकांडातील आरोपींनी यापुर्वी विजयकुमार व अंगद यांच्यावर अॅट्रासिटीच्या गुन्ह्यासह अनेक खोट्या तक्रारी दाखल केल्या होत्या. विजयकुमार पावडे हे होतकरू व गोरगरीब शेतकऱ्यांच्या अनेक मुलांना कुस्तीचे व पोलीस भरतीचे मोफत धडे देत असत त्यामुळे त्यांची सेलू परिसरात चांगली ख्याती असल्याने अश्या निस्वार्थ समाजसेवी व्यक्तीमत्वाचा खुन होणे ही समाजमन सुन्न करणारी घटना आहे. त्यांनी अनेक युवकांना प्रशिक्षित करून विविध प्रशासकीय सेवेत दाखल केले होते. अश्या समाज घडविणा-या विजयकुमार यांच्या हत्याकांडाचा आम्ही जाहीर निषेध करतोत. अशा व्यक्तीची हत्या गुंड प्रवर्तीच्या लोकांनी केली आहे.अशा वृतीला वेळीच पायबंद घालने हे प्रशानाचे काम असून या गुह्यतिल राहिलेल्या इतर लोकांना तात्काळ अटक करून कठोरातील कठोर शासन करावे व अन्याय ग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडचा वतीने लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन झेडन्याचा इशारा दिला आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे तालुका अध्यक्ष सैनिक बालाजी शिंदे, शहर अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,सोपान धापसे,संजय अंबोरे,उद्धव काजळे, अभिजीत देशमुख,भगवान रोकड़े,सुनील गाडेकर, उदय बांगर, कपिल काजळे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचा पदाधीकाऱ्याचा सह्या आहेत..
Post a Comment