जि.प. शाळांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडली. या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेमध्ये अनेक मैदानी खेळांचा समावेश होता. झालेल्या विविध खेळ-स्पर्धांमध्ये अव्वल क्रमांक पटकावित माध्यमिक चॅम्पियन व जनरल चॅम्पियनचा मान जि.प. शाळा सोनगावने पटकाविला.
स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी ललीतकुमार वर्हाडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी अंदेलवाड तर प्रमुख उपस्थीती म्हणुन सहायक गटविकास अधिकारी कु. सोनाली माडकर, गटशिक्षणाधिकारी अशोकराव इंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी आबीद सर, दाभाडे, केंद्रप्रमुख सर्वश्री कुरळकर, अतकरे, कावळे, रामटेके, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळा मुख्याध्यापिका अपुर्वा कदम, पदवीधर शिक्षक पंडीत बन्सोड, प्रदीप जाधव, संतोष राठी, सुलभा वानखडे, अर्चना काकडे यांनी परिश्रम घेतले. खो-खो, बॅडमिंटन या सांघिक तर वैयक्तिक क्रीडा प्रकारांत सोनगाव शाळेने आपले वर्चस्व राखले.

Post a Comment