BREAKING NEWS

Wednesday, March 1, 2017

वाशिम जिल्ह्यात चिमुरडीवर शिक्षकाने केला अत्याचार

वाशिम- महेंद्र महाजन /-


वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मनभा जिल्हा परिषद उर्दृ शाळेच्या लिंगपीसाट शिक्षकाने त्याचा शाळेतील वर्ग चवथीत शिकणाऱ्या  चिमुरडीवर तोंड दाबून अत्याचार केल्याची घटना दि 28 फेब्रुवारीला  उघडकीस आली . या लिंगपीसाट  शिक्षकाने गुरु शिष्याच्या नात्याला कलंकीत केल्याने  सर्वच स्तरातून चीड व्यक्त होत आहे .पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक केली आहे.
कारंजा शहर शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाते .कारंजा तालुका अंतर्गत येणाऱ्या मनभा येथील जिल्हा परिषद  उर्दू शाळेत चिमूरडिवर अत्याचार केल्याची घटना घडली दि 18 फेब्रुवारीला  सकाळी 9 वाजताच्या सुमारास वर्ग चवथीची विध्यार्थिनी लघुशंकेसाठी गेली असता त्याच शाळेवर वर्ग तिसरीला शिकविणारा लिंगपीसाट शिक्षक मतिन अब्दुल वहाब वय 31 वर्ष याने विध्यार्थिनींच्या मागोमाग शौचालयात प्रवेश केला. चिमुरडीवर दिवसाढवळ्या तोंड दाबून अत्याचार केला. कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.चिमुरडीने जिवाच्या भीतीने घृणास्पद प्रकाराबाबत कोणालाच सांगितले नाही . 27 फेब्रुवारीला काही शिक्षक व विध्यार्थी तालुकास्तरीय स्पर्धेसाठी गेल्याने विध्यार्थ्याना एकाच वर्गखोलीत बसायला सांगितले असता पीडित चिमुरडीने  अब्दुल  मतीन  अब्दुल वहाब या शिक्षकांच्या वर्गात बसायला नकार दिल्याने मुख्याधापकाने पालकाला बोलावून पीडिताला घरी घेऊन जाण्यास सांगितले .घरी येताचा चिमुडीने रडून सर्व घृणास्पद प्रकार आई वडिलांना सांगितला आई वडिलांनी चिमूरडीला सोबत घेऊन कारंजा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक करून अप न 22/17 कलम 376 (2)(ब)(फ)भादवी  3,4,5,6, बालकाचे लैंगिक गुन्हाचे  शोषण अधिनियम गुन्ह्याची नोंद केली पुढील तपास ठाणेदार अमर चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सरोदे करीत आहेत

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.