BREAKING NEWS

Monday, May 22, 2017

अशीही पत्रिका - लग्न पत्रिकेच्या माध्यमातून स्वच्छतेकडून समृद्धीकडे -रक्तदान, बेटी बचाओ बेटी पढाओ, शेततलाव -पाण्याचा थेंब दर्शवून पाणी वाचवा, पाणी जिरवा, चे आवाहन


अमरावती / परतवाडा - 





प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचाही शुभेच्छा -निमंत्रण पत्रिकेची केली प्रशंसा 


 - लग्न हि गोष्ट प्रत्येकाचा आयुष्यात एक महत्वाचा भाग असतो तो क्षण ते दिवस टी धावपळ  त्यातच महत्वाचा भाग असतो तो म्हणजे लग्नाचा पत्रिका ....अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यातील कांडली येथे वास्तव्यास असलेल्या श्री चेतन काणेकर यांनी आपल्या लागांची भन्नाट अशी सामाजिक संदेश देणारी पत्रिका बनविली आहे. त्यामध्ये या विवाह सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेच्या माध्यमातून मात्र त्याने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नपत्रिकेत साधारणत: नातेवाईकांची भरमसाठ नावे असतात, पण नेहमीच्याच या पद्धतीला कुठे तरी टाळा  देत पत्रिकेवरील जागेचा वापर विविध सामाजिक समस्यांबाबत जागृती करण्यासाठी करण्यात आला आहे.
या पत्रिकेत सर्वप्रथम श्री गणेश यांना वंदन करून अमरावती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांच्यासह संत सेनाजी महाराजांचे छायाचित्र आहे.  सामाजिक बांधिलकीसह या महान संतांचे विचार समाजाने अंगीकृत करावेत असा संदेश देण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे संकेत चिन्ह ,  स्वच्छ भारत अभियानाचा महात्मा गांधी यांचा चष्मा असून त्या चष्म्यामध्ये वर-वधूचे नाव देण्यात आले आहे. याच पत्रिकेत स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. विवाह मुहूर्त आणि विवाहस्थळ हे दर्शवताना हिरवळीचा वापर करण्यात आला. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी' या जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी टाकण्यात आल्या आहेत. 
याद्वारे झाडे लावा झाडे जगवा, हिरवळीद्वारे मानवाचे कल्याण होईल. पर्यावरण रक्षण आणि प्रदुषण टाळण्याचा संदेश देण्यात आला आहे. यासोबत रक्तदान, बेटी बचाओ बेटी पढाओ, पत्रिकेतून शेततलाव आणि पाण्याचा थेंब दर्शवून पाणी वाचवा, पाणी जिरवा, असे आवाहन करण्यात आले. असे महत्त्वपूर्ण अन् सद्यस्थितीत ऐरणीचे मुद्दे असलेल्या सामाजिक विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न लग्नपत्रिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. शासनाच्या सेवा घरबसल्या फक्त एका क्लिकवर मिळू शकतात, याची इंटरनेट मार्गिका www.aplesarkar.maharashtra.gov.in सुद्धा निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आली आहे. सदर निमंत्रण पत्रिका हि परतवाडा येथील अक्षर प्रिंटींग येथे बनविण्यात आली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.