Sunday, May 21, 2017
पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विनोद तायडे
Posted by vidarbha on 1:22:00 PM in महेंद्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / रिसोड -
वाशीम - मेडशी येथील तंटामुक्ती अध्यक्ष तथा एनटीव्ही न्युजचे पत्रकार विनोद तायडे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या वाशीम जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, वसंत मुंढे, प्रदेश उपाध्यक्ष कुंदन जाधव ,विभागीय अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या सुचनेनुसार राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी एका नियुक्तीपत्राव्दारे विनोद तायडे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. विनोद तायडे हे अनेक वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असून पत्रकारीतेच्या माध्यमातुन त्यांनी गोरगरीबांवर होणार्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे. जिल्हयात त्यांचा दांडगा जनसंपर्क, निष्कलंक चारित्र्य व पत्रकारीतेचा दांडगा व्यासंग या बाबी पाहून त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. दरम्यान संघटनेच्या पदाधिकार्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व त्यांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करुन आलेल्या संधीने सोने करु. व या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून जिल्हयातील लहानमोठ्या पत्रकारांचे मजबुत संघटन करुन पत्रकारांचे विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहु अशी प्रतिक्रिया विनोद तायडे यांनी आपल्या नियुक्तीसंदर्भात दिली.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment