BREAKING NEWS

Monday, October 24, 2016

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश – आगामी निवडणुकांसाठी रा.कॉंग्रेस पक्षाची तयारी जोरात


 
रंगय्या रेपाकवार / सिरोंचा /--



राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सिरोंचा येथील आढावा बैठकीत व तालुक्यातील टेकडा येथील कार्यकर्त्यांचा भव्य मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी राज्यमंत्री श्री धर्मराव बाबा आत्राम यांचा कार्यशैलीवर व नेतृत्वावर विश्वास ठेऊन सिरोंचा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी संघाचे ,विदर्भ आंदोलन समितीचे भाजपा व शिवसेनेचे असंख्य कार्यकर्त्ये व परिसरातील काही कार्यकर्त्ये व तरुण युवक यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
कार्यकर्त्यांचा रावेश कार्यक्रमात प्रामुख्याने माजी जी.प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम ,युवा नेते ऋतुराज हलगेकर , रा.कॉं तालुकाध्यक्ष आकुल मल्लिकार्जुन ,सतीश भोंगे , जेष्ठ नेते समय्या भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये व्यंकटापूर येथील श्री रमेश गुरनुले , एसके कुलमेधे,  ,रवी कार्मपल्ली, अनिल व्येंटा ,अशान मडावी ,रोमपल्ली येथील बंगा गावंडे , टेकडाताल येथील महेश आडे , श्रीनिवास कोन्तुल्ला ,

तसेच संतोष चंदावार , नागेश मडावी , केशव मडावी  आदी असंख्य कार्यकर्त्ये व तरुण  युवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी राज्यमंत्री श्री धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रत्येकाचा गळ्यात दुपट्टा टाकून त्यांचा प्रवेश स्वीकारला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.