BREAKING NEWS

Monday, October 24, 2016

पाच राज्यात एकाचवेळी होणार विधानसभा निवडणूक- सर्व पक्ष लागले तयारीला

नवी दिल्ली :  येणाऱ्या नवीन वर्षात फेबुवारी ते मार्च या कालावधीत एकाचवेळी उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये २०१७ची विधानसभा निवडणूक घेतली जाईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून २०१२ मध्ये पंजाब आणि मणिपूर राज्यांमध्ये ३० जानेवारीला, तर इतर राज्यांमध्ये फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्च या कालावधीत निवडणूक झाली होती.
संसदेत १ फेब्रुवारी २०१७ या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यानंतर या पाच राज्यांमधील निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाला निवडणूक आचारसंहितेचा अडथळा होणार नाही, असे निवडणूक आयोगाने प्रतिपादन केले आहे.
केंद्र सरकार आगामी वर्षापासून अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीऐवजी १ फेब्रुवारीला सादर करणार आहे. परिणामी निवडणुकांचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. सरकारने यासाठी निवडणूक आयोगाशी चर्चा केली होती. आयोगानेही १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यास आपला कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतरच पाच राज्यांमध्ये निवडणुका होतील, हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.