![]() |
व्यासपिठावर उपस्थित असलेले
|
- फेसबूक, यूस्ट्रीम प्रणाली यांच्या माध्यमातून सहस्रोंनी घेतला हिंदु धर्मजागृती सभेचा लाभ !
- पुणे येथील हिंदु धर्मजागृती सभेला ४ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती
पुणे - जम्मू-काश्मीरमधील समस्या ही केवळ त्या राज्याची नाही, तर ती राष्ट्रीय समस्या आहे. जिहाद्यांकडून साडेचार लक्ष काश्मिरी हिंदूंवर ते केवळ हिंदु असल्याच्या कारणावरून अत्याचार झाले. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरसुद्धा हे अत्याचार चालूच आहेत. संपूर्ण देश इस्लाममय करण्याचे धर्मांधांचे ध्येय आहे; पण राज्यकर्त्यांना धर्मांधांची ही मानसिकता समजलेली नाही. किंबहुना सत्तेच्या लालसेपोटी राज्यकर्ते देशहित पहाण्यास विसरून गेले आहेत. जोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानपूर्वक पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले.
काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी २३ ऑक्टोबर या दिवशी येथील रमणबाग शाळेच्या पटांगणावर काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी हिंदूंना जागृत आणि कृतीशील करण्यासाठी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.
पनून कश्मीर, हिंदु जनजागृती समिती, काश्मिरी हिंदू सभा पुणे, लष्कर-ए-हिंद, हिंदु एकता आंदोलन पक्ष यांसह अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या हिंदु धर्मजागृती सभेला ४ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती होती.
श्री. मुतालिक पुढे म्हणाले की, काश्मीरमधील हिंदूंचे हत्याकांड करून त्यांना विस्थापित होण्यास भाग पाडून, हिंदु महिलांवर अत्याचार करून, तसेच मंदिरे जमीनदोस्त करून धर्मांधांनी जिहादी आतंकवादाची चाचणी घेतली. काश्मिरी हिंदूंवर एवढे अत्याचार होऊनही देशभरातील उर्वरित हिंदु समाज शांत राहिला. जिहादी आतंकवादाची काश्मीरमधील चाचणी यशस्वी झाल्याने देशभरात काश्मीरसारखे ५० सहस्र छोटे भाग निर्माण झाले आहेत आणि त्या ठिकाणी जिहादी आतंकवादाचे प्रयोग होत आहेत. पुण्यातही कोंढवा, लोहियानगर यांसारख्या ठिकाणी असे भाग निर्माण झाले आहेत. या स्थितीकडे जागृतपणे पाहून हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.

व्यासपिठावर उपस्थित
संत आणि मान्यवर वक्ते !
या सभेस पनून कश्मीरचे अध्यक्ष सर्वश्री डॉ. अजय च्रोंगू, युथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल, जम्मू फॉर इंडियाचे समन्वयक डॉ. हरि ओम, भारत रक्षा मंचचे महासचिव श्री. अनिल धीर आणि संयोजक श्री. मुरली मनोहर शर्मा, शिवसेना तेलंगणा आणि आंध्रप्रदेशचे राज्य अध्यक्ष श्री. टी.एन्. मुरारी, शिवसेना तमिळनाडूचे श्री. राधाकृष्णन्, हिंदू फ्रंट फॉर जस्टीसचे राष्ट्रीय प्रवक्ता अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन, लष्कर-ए-हिंदचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता श्री. देवदास शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक, सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, गोरक्षा मंच मुंबईचे श्री. वैभव राऊत, तसेच हिंदु मक्कल कत्छीचे श्री. देव गोविंद राजू आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
पनून कश्मीरला मिळणारा देशव्यापी
पाठिंबा हे भगवंताचे अवतारी कार्य !
- डॉ. अजय च्रोंगू, अध्यक्ष, पनून कश्मीर
गेली २५ वर्षे पनून कश्मीरची मागणी होत आहे; पण हा एक दैवयोग अथवा भगवंताचे अवतारी कार्य असावे की, गेल्या दीड वर्षापासून कन्याकुमारीपासून आसामपर्यंतचे हिंदू एक होऊन पनून कश्मीरची मागणी करत आहेत !

Post a Comment