BREAKING NEWS

Tuesday, December 20, 2016

चांदुर रेल्वे तालुक्यातील हजारो अंध-अपंग बांधव आधार योजनेतून वंचित - तात्काळ सेवा देण्याची मागणी

चांदुर रेल्वे - (शहेजाद  खान)-




राज्यातील संपूर्ण अंध-अपंग लोकांना अद्यापही आधार योजनेचा लाभ मिळाला नसल्याने हजारो अंध-अपंग लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहत आहे. त्यामुळे तात्काळ आधार योजनेचा लाभ देण्यात यावा यासाठी आज चांदुर रेल्वे येथील तहसीलदार यांना प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.


                          राज्यातील अंध-अपंग लाभार्थी आधीच मानसिक खचलेले असतांना त्यांना अद्यापही शासनाच्या योजनांचा पाहिजे तसा लाभ मिळत नाहीये. योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर  आता आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. अशातच तालुक्यातीलच नव्हेतर संपूर्ण राज्यातील अंध-अपंग लाभार्थ्यांना अद्यापही आधार कार्ड योजनेचा लाभ मिळालेला नाहीये.
                                 शासनाच्या अनेक लोकपयोगी हिताच्या अंध-अपंगांच्या योजना असतांनाही त्याचा लाभ अंध-अपंग घेत नसल्याने त्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी आधार कार्ड ही अट अडसर ठरत आहे. त्यामुळे शासनाने आता एकतर हि आधार कार्डची अट शिथिल करावी अन्यथा अंध-अपंगांना तात्काळ आधार कार्ड योजनेचा लाभ घ्यावा अशी मागणी केल्या जात आहे.

                                       यासाठी चांदुर रेल्वे तालुक्यात प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वात आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रतिलिपी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी किरण गित्ते, तर आधार क्षेत्रीय कार्यालय मुंबई यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस संदीप सोळंके, महिला तालुकाध्यक्षा मालिनीताई वाघ, अक्षय जामदार, राहुल शेळके, प्रशांत सिसोदिया, सुधीर शेळके, प्रल्हादराव चौधरी, नीलकंठ निहाटकर, अवदुतराव मेश्राम, बबनराव मोहोड, प्रदीपराव नेहटकर, विलास पाटील, विजय चतुर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.