BREAKING NEWS

Friday, January 20, 2017

राजपूत चेतनामंच,अचलपूर महिला समिती ने साजरा केला हळदीकुंकू व बालसंस्कारचा कार्यक्रम

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-


 स्थानीक वाघामाता संस्थान येथे मकरसंक्राती निमित्त राजपूत महिला समितीने असंख्य महिलांच्या उपस्थितीत हळदीकुंकु व बालसंस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.



याप्रसंगी महाराणा प्रताप व लालजीशहा यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन जुळ्या शहराच्या नगराध्यक्षा सुनिता नरेंद्र फिसके व शिवसेना शहर महिला प्रमुख श्रध्दाताई विटाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सविता चौहान यांनी मान्यवरांचे शालश्रीफळ देवून स्वागत केले राधिका बैस यांनी प्रास्तावीकात समाजाच्या विकासासाठी ज्ञान विज्ञान व तत्वज्ञानासोबत बालसंस्कार तसेच मातृपितृ पुजनाचे महत्व स्पष्ट केले.सुनिताताई फिसके यांनी महिलांच्या दृष्टीने शहरात विकास करण्यासाठी शासन व सामाजिक संघटना यांचा ताळमेळ ठेवून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तर श्रध्दाताई यांनी सर्वांना शुभेच्छा देत रचनात्मक कार्य करण्याचा संदेश दिला.लहान बालकांची लुट व महिलांना हळदीकुंकु,तिळगूळ व वाण वितरणानंतर श्रीयोगी वेदांत सेवासमिती अमरावती च्या कार्यकर्त्यांनी सामाजिक,सांस्कृतिक व आध्यात्मिक प्रगती करिता बालसंस्कार कार्यक्रमाचे संचलन करतांना मातृपितृ पुजन घेतले.सर्वांनी आपल्या मातापित्यांचे मनोभावे पूजन केले याप्रसंगी सर्व मातापित्यांनी अतिशय भाऊक होवून आपल्या पाल्यांना विद्यावान,वेदवान,राष्ट्रभक्त,समाजशिल व दीर्घायुषी होण्याचा आर्शीवाद देत त्यांच्या सुखी व सुरक्षित जिवनाबद्दल परमेश्वरचरणी प्रार्थना केली.कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अर्चना राठोड,नीलिमा पवार,निता तरवले,वर्षा रघुवंशी,दर्शना चौहान,लता चौहान,सरिता परिहार,क्रांतीदेवी हजारी,लिला बघेल,रमा गौतम,रत्नप्रभा किल्लेदार,लता तोमर,सपना ठाकुर,संगीता बैस,अनुराधा सोलंकी,माधुरी बैस,किरण राठोड व समस्त सदस्यांनी परीश्रम घेतले कार्यक्रमाचे संचलन भुमिका चौहान व ऋचा परिहार यांनी तर आभार सपना ठाकुर यांनी केले शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.