BREAKING NEWS

Saturday, May 13, 2017

माजी सैनिकांसाठी नोकरीच्या विविध संधी



महेंद्र महाजन जैन / रिसोड 

वाशिम,  :  देशात माजी सैनिकांसाठी नोकरीमध्ये राखीव पदांचा तपशील पुनर्वसन महानिर्देशालय दिल्ली यांच्या www.dgrindia.com या संकेस्थळावर कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात येतो. तरी नोकरी करिता इच्छुक माजी सैनिकांनी या संकेतस्थळाला भेट देऊन पदास अनुसरून पात्रतेनुसार कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

सदर संकेतस्थळावर अमीटी युनिव्हर्सिटी सुपरवायझर ५ पदे, फौंडेशन फॉर लर्निंग टेक्नोलॉजीज दिल्लीमध्ये कॉर्डीनेटर अॅडमिनिस्ट्रेशन पदाकरिता ०१, इंडियन ऑईल लिमिटेडमध्ये वेगवेगळ्या पदांच्या ०६ जागा, सेन्ट्रल ग्राउंड वॉटर बोर्डमध्ये ड्रीलर इनचार्जच्या ०४ जागा, आयआयटी दिल्लीमध्ये सिक्युरिटी इन्स्पेक्टरच्या ०३ जागा आणि आयएसएस एसडीबी सेक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि., झार्सुगुंदा, ओडीसा येथे सिक्युरिटी गार्ड, सिक्युरिटी सुपरवायझर, एएसओ एसओ पदाकरिता १३० जागा अशी पदे उपलब्ध आहेत. तरी इच्छुक व पात्र माजी सैनिकांनी दि. १५ मे २०१७ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.