BREAKING NEWS

Saturday, June 10, 2017

हिंदूंच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गोवा येथील हिंदू अधिवेशन प्रभावी व्यासपीठ ! – श्री. राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती


सोलापूर – डावीकडून श्री. बापू ढगे, श्री. राजन बुणगे आणि श्री. हिरालाल तिवारी
सोलापूर – ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन उभे करण्यासाठी आणि हिंदूंच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी १४ ते १७ जून या कालावधीत गोवा येथे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. हे हिंदू अधिवेशन म्हणजे प्रभावी व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन सोलापूर येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी केले. या पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्ते श्री. बापू ढगे आणि सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी उपस्थित होते. श्री. बापू ढगे या वेळी म्हणाले, ‘‘मी सलग २ वर्षे अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये सहभागी होत आहे. या अधिवेशनामध्ये हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी कृतीप्रवण होण्याची योग्य दिशा मिळते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणार आहे.’’

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.